ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रम्हपुरी तालुक्यात महसूल विभागाची कार्यवाही

मागील १५ दिवसामध्ये १४ ट्रॅक्टर व १ हायवा जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- चंद्रपुर चे जिल्हाधिकारी मा. विनय गौडा जि.सी. व मा. उपविभागीय अधिकारी श्रीमती पर्वणी पाटील यांचे मार्गदर्शनात ब्रम्हपुरीचे तहसीलदार श्री सतिश मासाळ यांनी अवैध रेती वाहतुकीचे विरुद्ध मोठी कारवाई केली आहे. या कारवाई मध्ये नायब तहसीलदार श्री आशीष तालेवार, श्री आकाश करवते, मंडळ अधिकारी श्री हीमांशु पाजनकर, श्री इसड तलाठी श्री राऊत तलाठी यांनी सहभाग घेतला. दिनांक ०५.१०.२०२४रेतो वाहतुक करणारे ०५ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले.

तसेच मागील १५ दिवसामध्ये १४ ट्रॅक्टर व १ हायवावर अवैध वाहतुकोची कार्यवाही केलेली आहे. जप्त केलेल्या ट्रॅक्टर व हायवावर दंडात्मक कारवाई केलेली असुन रुपये ४,४८,००० /- महसुल शासन जमा केलेला आहे. ईतर वाहनांवर दंडात्मक्त कारवाई सुरु असुन रुपये ८,००,०००/- महसुल शासन जमा होणार आहे.

तसेच रात्री भरारी पथक तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे अवैध रेती चोरी वर आळा बसणार आहे.

यावर्षी चेकपोस्ट व पथके तयार करुन अवैध रेती वाहतुकीवर अधिक तिव्र कारवाई करण्यात येणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये