सावलीत वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा शनिवारी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली :- स्थानिक स्वराज्य निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकतीने सर्व निवडणूका लढणार आहे.ऍड बाळासाहेब आंबेडकर संपूर्ण राज्यात सर्व वंचित,पिढीत,शोषित,मजूर, शेतकरी,बेरोजगार,विद्यार्थ्यांच्या हक्काची लढाई संविधानिक, न्यायालयीन तथा रस्त्यावरच्या लढाईतुन लढत आहेत.
बहुजन समाजातील एसी, एसटी, ओबीसी समाज घटकाच्या न्यायासाठी बाळासाहेब आंबेडकर अविरत लढा देत आहेत.यामुळे सावली तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे अधिकाधिक सदस्य निवडणूक जावेत.
आपल्या बहुजनांच्या समस्या त्यांनी ताकतीने सोडवाव्यात या उद्देशाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात २१ फेब्रुवारी शनिवारी १ वाजता कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.तरी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वेळेवरच जमण्याचे करावे असे आवाहन सावली तालुका वंचित बहुजन आघाडीच्या महिला संघटनेच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.



