ख्रिस्तानंद चौकात ऑटो युनियन संघटनेच्या वतीने महाप्रसादचे वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :- विदर्भ सहा सिटर ऑटो युनियन संघटना ब्रह्मपुरी- नागभीड तसेच मित्र परिवार खिस्तानंद चौक ब्रम्हपुरीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा महाशिवरात्रीच्या निमित्ताने भव्य महाप्रसाद वितरण सोहळा कार्यक्रम घेण्यात आला.
सोहळ्याच्या उदघाटक म्हणून प्रमोद बानबले पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी, कार्यक्रमाचे अध्यक्ष गोवर्धन दोनाडकर पत्रकार ब्रम्हपुरी, शिवसेना तालुका प्रमुख नरेंद्र नरड, डॉ.अमोल माकडे, पत्रकार नंदू गुड्डेवार, पत्रकार अमर गाडगे, हिरालाल मेश्राम,आदी मान्यवर उपस्थित होते.
विदर्भ सहा सिटर ऑटो यूनियन संघटना खिस्तानंद चौकातील दरवर्षी प्रमाणे यावर्षी महाशिवरात्री यात्रा निमित्याने महाप्रसाद वितरण सोहळा कार्यक्रम घेतात. ऑटो संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
मान्यवरांनी महाशिवरात्री निमित्त चालत आलेली महाप्रसादाची परंपरा कायम ठेवल्यामुळे ऑटो युनियनचे सर्व संघटनेच्या लोकांचे अभिनंदन करून कौतून केले व महाशिवरात्री निमित्त मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र मेश्राम यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीते करिता संघटनेचे उपाध्यक्ष कीष्णा नागोसे, सचिव लेखानंद मेश्राम, महेश गोटेफोडे, प्रदीप अडेटीवार, सुभाष सोरते, विशाल मेश्राम, संपत मेश्राम, सुरेश मुळे, सुरेश मुळे, सुनील गायधने, धनराज मानकर, सुनिल गुद्देवार, व ख्रिस्तानंद चौकतील मित्र परिवार तसेच कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्य केले.



