ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनेक शिक्षकांचा पुरोगामी शिक्षक संघटनेत प्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- राज्यनेते विजय भोगेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन कोरपणा तालुक्यात कार्यरत विविध संघटनेत कार्य करत असणाऱ्या शिक्षकांनी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेत मोठ्या उत्साहात प्रवेश केला. कोरपणा येथे जंगी कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा पार पडला. राज्यनेते विजय भोगेकर, वासुदेव गौरकार, दौलत मरापे,रवी सोयाम,सुरेश गिलोरकर,विनोबा आत्राम,संतोष जुनघरी,संदीप कोंडेकर या मान्यवरांच्या उपंस्थितीत हा सोहळा पार पडला.

प्रवेश केलेल्या शिक्षकांना कधीही कुठलीही समस्या उद्भवली तर पुरोगामी शिक्षण संघटना कायम आपल्या पाठीशी उभी राहिल असा विश्वास भोगेकर यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केला.

पुरोगामी संघटनेत प्रवेश घेणाऱ्या शिक्षकात गडचांदूर शिक्षक पतसंस्थेचे संचालक काकासाहेब नागरे यांच्या सह नरेंद्र गेडाम, संजय मरापे, विनोद वरखडे,जंगू रायसिडाम,संदीप मुंडकर,अमोल मेश्राम,भाऊराव पंधरे,निलेश मडावी,सत्यविजय मडावी,सोमेश्वर आमुगे,वासुदेव सोयाम,शिवाजी नारे, अजय राठोड,अशोक राठोड, गोविंद पेद्देवाड,बालाजी म्हेत्रे,गजानन तिडके, गोपीचंद करंडे, विलास किन्नाके, मेहरबान राठोड, बालाजी नरवटे,रविंद्र टेकाम, विनायक कन्नाके यांच्या सह ५० शिक्षकांनी पुरोगामी संघटनेत प्रवेश केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये