ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पी. एम. श्री योजनांतर्गत गवराळा शाळेत वृक्षारोपण संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

 कावळा करतो काव काव

माणसा माणसा झाडे लाव…!!!

उन्हा तान्हात हवी असेल सावली 

तर वृक्ष लावा पावलोपावली!! आदी घोषवाक्य देऊन…

    तसेच वृक्ष हि काळाची गरज हा मूलमंत्र देत वृक्ष हे पर्यावरनिय समतोलपणा राखून प्रदूषण कमी करतात, वृक्षामुळेच आपल्याला निरोगी व आनंदी जीवन जगता येते असे वृक्षारोपणाचे महत्व पटवून देत आज गवराळा वॉर्ड भद्रावती येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका वनिता कोरडे, शिक्षिका शुभेच्छा साठे, व शाळेतील शिक्षिका तसेच शाळा सुधार समितीचे अध्यक्ष दिपक पोटे यांचे प्रमुख उपस्थितीत सोहळा पार पडला.माझी शाळा सुंदर शाळा असे नारे देत आरोही खडसे, स्वरा सोनटक्के, प्राची मिटपल्लीवार, सम्यक खैरे, दुर्वा गेडाम, या वर्ग ६ वी च्या चिमुकल्या विद्यार्थिनीच्या हस्ते वृक्षारोपण करून शाळा परिसर व आवार सुंदर व रमणीय करण्यात आला.

 यावेळी सामाजिक कार्यकर्ते लिमेश माणूसमारे, पालक प्रेम पलगंट्टीवार, शाहरुख पठाण, दिपाली झिंगरे, आदी नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये