Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

कोरपना येथे माता व पालक मेळावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना – सर्च फाउंडेशन, चंद्रपूर संचालित स्कॉलर्स सर्च अकॅडेमी व ज्यू कॉलेज कोरपना येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त माता पालक मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली याप्रसंगी कन्हाळगाव सरपंच सुरेखा विनोद नवले, चनई सरपंच रेश्मा अरुण मडावी ,सुषमा पोटे, नगरसेविका मनीषा प्रशांत लोडे, वनरक्षक सुनिता मांडवकर, स्नेहा पाटील, प्राचार्य राहुल उलमाले आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकून आजच्या काळातील स्त्रीने कसे वागावे व आपल्या पाल्यांमध्ये सुसंस्कारांची भर घालून त्यांना आदर्श व्यक्ती घडविण्यासाठी कसे लक्ष्य द्यावे, यावर विचार मांडले. महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते, आणि विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली.

कार्यक्रमाला उपस्थित महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रमही घेण्यात आला. प्रास्ताविक उपप्राचार्य करिश्मा साटोने तर आभार प्रदर्शन पूजा मॅम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष जेनेकर, सारिका ढोंगले, प्रीती बुटले, उज्वला वडस्कर, दिव्या शेंडे, प्रांजली मोहितकार, नेहरीका हंसकर, वर्षा राऊत, सुमेग तेलंग, शाम वाघमारे, संकेत साखरकर, विशाल मालेकर , टोंगे यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये