ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एनसीसी प्रशिक्षणातून आदर्श व्यक्तिमत्व घडते – कर्नल समीक घोष 

शिबिरात 400 छात्र सैनिकांचा समावेश 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : ‘सैन्य दलाची दुसरी फळी म्हणजे राष्ट्रीय छात्र सेना होय. शिस्त निर्भयता जागरूकता राष्ट्रप्रेम व समर्पणाची भावना निर्माण करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. ज्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता सैनिकी निर्माण होते. एनसीसी प्रशिक्षणातून आदर्श व्यक्तिमत्व घडते असे प्रतिपादन 21 महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे कमान अधिकारी तथा शिबिर प्रमुख कर्नल समीक घोष यांनी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ८ नोव्हेंबर रोजी बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात छात्र सैनिकांना मार्गदर्शन करताना केले.

मंचावर अध्यक्षस्थानी एनसीसी बटालियनचे कमान अधिकारी कर्नल समीक घोष तर प्रमुख अतिथी म्हणून प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल नवनीत थापा व सुभेदार मेजर दिलबाग सिंग उपस्थित होते.

शिबिरात आपत्ती व्यवस्थापन, पथ संचलन, निशानेबाजी, नकाशा वाचन, युद्ध कला, ड्रिल, शारीरिक शिक्षण, विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बौद्धिक विकासाकरिता विविध व्याख्यानांचा समावेश आहे. शिबिरात वर्धा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील 400 सैनिकांनी सहभाग घेतला आहे.

शिबिराच्या यशस्वी ते करिता एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर, कॅप्टन नंदकिशोर बिजागरे, सेकंड ऑफिसर जे. एम. वैद्य, फर्स्ट ऑफिसर विक्रांत भागवतकर, स्वप्निल आगाशे, प्रशांत बालकी, सुभेदार हरी ग्यानी, सुभेदार रवींद्र सिंग, सुभेदार अरविंदर सिंग, बटालियन हवालदार मेजर भीमराव जाधव, हवालदार दूधे, हवालदार पटले यांच्यासह सैन्य दलाचे प्रशिक्षक कार्यरत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये