ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
भव्य गणेश पालखी शोभायात्रेचे आ. जोरगेवार यांनी केले स्वागत

चांदा ब्लास्ट
धार्मिक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर शहरात आज गणेश जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात भव्य गणेश पालखी शोभायात्रा काढण्यात आली विठ्ठल मंदिर वार्ड येथील गणेश मंदिरातून प्रारंभ झालेल्या या शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात गणेशभक्त सहभागी झाले होते.
शोभायात्रा भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालया जवळ पोहोचल्या नंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी शोभायात्रेचे स्वागत केले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी श्री गणेशाचे भक्तिभावाने दर्शन घेतले. तसेच गणेशभक्तांचे स्वागत करण्यात आले व त्यांना शीतपेयांचे वाटप करण्यात आले.



