ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देणारा प्रेरणादायी हळदीकुंकू कार्यक्रम

काँग्रेस नेते व सामाजिक कार्यकर्ते भास्कर कावळे, सोनाली भास्कर कावळे यांचा पुढाकार; कार्यक्रम ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

चांदा ब्लास्ट

बल्लारपूर काँग्रेस कमिटीच्या वतीने कोर्टीमत्ता येथे येथे दि. २१/०१/२०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमात कोर्टीमत्ता, कोर्टीतुकूम व कोर्टी परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सौ. अलका अनिल वाढई उपस्थित होत्या. यावेळी काँग्रेस कमिटीच्या शहर अध्यक्षा तथा महिला व बालकल्याण सभापती मेघा भाले, तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंद उपरे, महिला काँग्रेस अध्यक्षा अफसाना सय्यद मॅडम, काँग्रेस नेते व सामाजिक कार्यकर्ते भास्कर कावळे, सौ. सोनाली भास्कर कावळे, सामाजिक कार्यकर्ते राजू मेश्राम, किन्हीचे माजी सरपंच वासुदेव येरगुडे, तसेच तालुका काँग्रेस उपाध्यक्षा नाजुका हनुमान आलाम यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांना भेटवस्तू देऊन हळदीकुंकवाचा कार्यक्रम आनंदात साजरा करण्यात आला. महिलांमध्ये सामाजिक एकोपा वाढविणे, सन्मानाची भावना निर्माण करणे तसेच सांस्कृतिक परंपरेचे जतन व संवर्धन करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी महिलांच्या सशक्तीकरणावर मार्गदर्शन करत महिलांनी आत्मविश्वासाने सामाजिक व सार्वजनिक जीवनात पुढे यावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. सोनाली भास्कर कावळे यांनी केले, तर संचालन तालुका काँग्रेस उपाध्यक्षा सौ. नाजुका हनुमान आलाम यांनी केले. आभार प्रदर्शन भास्कर कावळे यांनी केले.

महिलांच्या सशक्तीकरणाचा ठोस संदेश देणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला असून, महिलांना सामाजिक सहभाग, आत्मसन्मान आणि संघटनाची ताकद यांची जाणीव करून देणारा ठरला. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, काँग्रेस कमिटीच्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरात विशेष स्वागत करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये