ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाकेबंदी करून देशी दारूने भरलेल्या 150 पेट्या व चारचाकी वाहनासह 22 लाख 10 हजाराचा मुद्देमाल जप्त

स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांची धडक कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 21/01/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक वर्धा तर्फे अवैद्य धंदयावर कारवाई संबंधाने पो. स्टे. सावंगी (मेघे) परीसरात पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरकडुन मिळालेल्या गोपणीय माहिती वरून आरोपी नामे राहुल प्रकाश पवार हे त्याचे ताब्यातील बुलेरो पिकप मालवाहू क्रमांक MH 52 0026 चारचाकी वाहनाने देशी दारूचा माल तुळजापूर हायवे नि वर्धा कडे घेऊन येत आहे. अश्या माहिती वरून पंछी धाब्या जवळ नाकेबंदी करून त्यांचेवर प्रो रेड केला असता आरोपी व आरोपीच्या वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली असता वाहनांमध्ये 150 खरड्याच्या खोक्यात देशी दारूने भरलेल्या राकेट संत्रा कंपनीचे प्लास्टिक शिशी मध्ये 90 एम एल चे 15,000 शिश्या तसेच नगदी पैसे व मोबाईल सह असा एकुण जु. कि. 22,10,000/-चा मुद्देमाल माल मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त केला. आरोपीयास दारू माल कुठून आणला याबाबत विचारणा केली असता भूषण पाटील रा. मुकटी जि. धुळे (पसार) याने दारू माल दिल्याचे सांगितले वरून सदर दोन्ही आरोपीविरुध्द पो. स्टे. सावंगी मेघे येथे गुन्हा नोंद केला. पुढील तपास करीत आहे

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनि प्रकाश लसूण्ते पोलीस अंमलदार शेखर डोंगरे विकास मुंडे, सुगम चौधरी, शुभम राऊत,राहुल लुटे  यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये