गावासाठी चांगले रस्ते तर सुदृढ शरीर ठेवण्यासाठी खेळ आवश्यक – अर्चना भोंगळे
पालगाव येथे रस्त्याचे लोकार्पण व कबड्डी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना : चांगले सुसज्ज रस्ते असणे देशाच्या विकासाचे प्रतीक आहे, चांगल्या रस्त्यावरून देशाच्या विकासाची व्याख्या ठरविली जाते तर आजच्या धावपळीच्या युगात शरीर सुदृढ व निरोगी ठेवण्यासाठी खेळ अत्यंत आवश्यक आहे. खेळांमुळे शारीरिक व्यायाम होऊन मानसिक ताणतणाव देखील कमी होण्यास मदत होते. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन दिनचर्येत खेळाला स्थान दिले पाहिजे. असे प्रतिपादन सौ.अर्चना देवराव भोंगळे यांनी केले.
कोरपना तालुक्यातील पालगाव येथे (दि.१९) अल्ट्राटेक माईन्स ते पालगाव या बहुचर्चित रस्त्याचे लोकार्पण व कबड्डी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा थाटात पार पडला. यावेळी सौ.अर्चना भोंगळे बोलत होत्या.
यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे म्हणाले की, अल्ट्राटेक माईन्स ते पालगाव गावापर्यंत जाणारा रस्त्याची अतिशय बिकट अवस्था होती.त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास व संघर्ष करावा लागला. मात्र आता या रस्त्याचे लोकार्पण झाल्याने गावकऱ्यांचा प्रवास सुखकर झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अल्ट्राटेक माईन्स ते पालगाव रस्त्याचे लोकार्पण व कबड्डी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी अर्चना भोंगळे,भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजपाचे कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, पालगावचे (बाखर्डी)सरपंच अरुण रागीट, राजुरा शहर महामंत्री सचिन भोयर, महामंत्री रवी बंडीवार, सतीश जमदाडे, बंडू निरंजने, बिशण कुमरे, लालचंद नगराळे, पांडुरंग रागीट, अनिल आत्राम, रवी रायपूरे, देवराव गिरटकर, सिद्धार्थ कुंभारे,महादेव मडावी, गजानन पेंदोर, गौतम खोब्रागडे,नामदेव उमरे,सुभाष टेकाम,माया मडावी,भाग्यश्री रागीट यांचेसह भाजपा कार्यकर्ते व पालगाव येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



