ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समर्थ फार्मसीचे विद्यार्थी गाडेकर आणि निलक अंतर महाविद्यालयीन झोन एच मध्ये चमकले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी देऊळगाव राजा चे विद्यार्थी सर्व क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत आहे, आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी आपला दरारा कायम करत इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्पोर्ट्स असोसिएशन (इडीसा)च्या वतीने राबवल्या जाणाऱ्या अंतर महाविद्यालयीन स्पर्धा मध्ये समर्थ औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे,श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था संचलित समर्थ औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या डी फार्मसी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी इडिसा च्या वतीने खेळवल्या जाणाऱ्या अनेक स्पर्धा पैकी मैदानी खेळ धावणे, उंच उडी, गोळा फेक, भाला फेक अश्या प्रकारच्या या स्पर्धेत झोन एच मध्ये यश संपादन करून पुढील फेरीत प्रवेश मिळवला आहे.झोन एच मध्ये ते विजयी ठरले आहेत.त्यामध्ये महाविद्यालयातील ऋषीकेश निलक व गणेश गाडेकर या विद्यार्थ्यांनी यश संपादन करून विजय मिळवला आहे.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी इडीसा एच झोन च्या अंतर महाविद्यालयीन स्पर्धेत विजय मिळवून उत्कृष्ट ठरले आहेत. इ इडीसा च्या मार्फत मैदानी खेळ धावणे, उंच उडी, गोळा फेक, भाला फेक असे अनेक खेळ खेळवले जातात. त्यातील धावणे 800 मिटर व 100 मिटर या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विजय मिळवला आहे. त्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती नंदाताई कायंदे, सचिव सतिषभाऊ कायंदे, सहसचिव आमदार मनोजभाऊ कायंदे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रफुल्ल ताठे, उपप्राचार्य डॉ. गोपालकृष्ण सीताफळे, विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम लड्डा, विभाग प्रमुख प्रा. किशोर चराटे व क्रीडा प्रभारी प्रा. उमेश पिंपळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतूक करत, खूप खूप अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये