विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक उत्सव महत्वाचे : ॲड. युवराज धानोरकर
फेरीलैंड शाळेत वार्षीकोत्सव साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
नेहमीच्या अभ्यासाव्यतिरीक इतर अनेक कलागुण प्रत्येक विद्यार्थ्यात दडलेले असतात.अशा कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेचे वार्षीकोत्सव हे महत्वाचे असतात.या व्यासपिठावरुन विद्यार्थी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करुन भविष्यात वीवीध क्षेत्रात आपले नाव मोठे करु शकतात असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख ॲड.युवराज धानोरकर यांनी केले.शहरातील फेरीलैंड शाळेत वार्षीकोत्सवचे आयोजन करण्यात आले त्यात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर ॲड.युवराज धानोरकर, नगराध्यक्ष प्रफुल चटकी, ऊपाध्यक्ष सुधीर सातपुते, संस्थेच्या ऊपाध्यक्ष सुशीला कौरासे, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम कौरासे, सचीव मिलींद जिवणे,सदस्य निरुपा जिवणे, अमोल पाटील, प्राचार्या वर्षा जिवणे ,प्रज्ञा ठाकरे आदी मान्यवर उपस्थीत होते.यावेळी पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून शाळेच्या विद्यार्थ्यांनी बहारदार एकापेक्षा एक सरस असे विवीध कार्यक्रम सादर केले.यात एकल नृत्य, समुह नृत्य, गीत,नाटीका अशा कार्यक्रमांचा समावेश होता.सर्व विजेत्यांना व सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करुन त्यांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या वर्षा जिवणे यांनी संचालन शाळेच्या विद्यार्थ्यांनी तर आभार कुमुद पोईनकर यांनी मानले.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक,शिक्षीका,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाला पालक,विद्यार्थी व नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



