ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नायलॉन मांजाचा वापर आणि विक्री केल्यास होणार कठोर कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नायलॉन मांजाच्या वापराबाबत स्वताहून SMPL. No.01/2021 दाखल करून दिनांक 12.01.2026 रोजी आदेश पारित केले आहे, त्यात मा. उच्च न्यायालयाने अत्यंत कठोर पवित्रा घेतला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री, साठा किंवा वापर करणाऱ्यांवर आता मोठी दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जाणार आहे. ती खालील प्रमाणे

01) विक्रेत्यांसाठी दंड: नायलॉन मांजा विकणाऱ्या जर कुणी मिळून आला तर संबंधित दुकानदारांना २.५ लाख रुपये दंड जागीच तात्काळ आकारला जाईल.

02) वापरकत्यांसाठी दंडः जर कुणी नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवितांना मिळून आल्यास त्यांचेकडून 25000 रुपये दंड जागीच आकरण्यात येईल.

03) जर अल्पवयीन मुले नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवितांना मिळून आल्यास, त्यांच्या पालकांकडून 25000 रुपये तंड जागीच वसूल केला जाईल.

04) जर कुणी पैसे भरण्यावावत टाळाटाळ करत असेल तर त्यांच्याकडून जमीन महसूल कायद्या प्रमाणे दंड वसूल केला जाईल.

05) प्रत्येक अन्लंधणासाठी स्वतंत्र दंड आकरण्यात येईल.

(06) वरीलप्रमाणे दंड वसूल करून दोषींवर प्रचलित कायराप्रमाणे गुन्हे दाखल केले जातील.

तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी पर्यावरणपूरक सुत्री धाग्याचा (साध्या मांजाचा) वापर करावा यांची विक्री होत असल्यास किंवा पतंग उडवितांना त्याचा वापर होत असल्यास तात्काळ ‘112’ किंवा 8888338354 या क्रमांकावर तक्रार करावी,

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये