आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रसन्मान कर्तव्याचा

मनीषा मेघे यांनी दिली पंचवीस हजाराची मदत ठेव

कल्यानीला होणार शिक्षणासाठी मदत ; स्व. विभावरी बारहाते यांच्या जयंती निमित्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

शिवाजी चौधरी संचालित सेवा श्रम येथील दहावीत उत्कृष्ठ गुण प्राप्त करणाऱ्या कल्यानीच्या नावे स्व.विभावरी बारहाते यांच्या जयंती निमित्त पंचवीस हजार मुदत ठेव देऊन प्रोत्साहित करण्यात आले.

आई घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपुलकीने जेवण खाऊन घालायची.आईनी आयुष्यभर दीन दुबळ्या,गरीब वंचित घटकासाठी काम केले. आज त्यांचाच वारसा घेऊन आम्ही सर्व भावंड समाजात सामाजिक दाईत्व म्हणून समजाच आपला काही देणं लागत या भावनेतून आम्ही समाजात काम करतो आहे.दोन वर्षापूर्वी आई आपल्यातून निघून गेली परंतु तिच्या आठवणीत दर वर्षी एका मुलींच्या नावे पंचवीस हजार रुपये मुदत ठेव करून देत असते.या पुढे दिखील माझ्या जे काही करता ते मी नक्कीच करेल असेल आश्वासन मनीषा मेघे यांनी दिले.

डॉ.मेघे बोलताना म्हणाले, आईच्या कार्याचा वारस घेत,माझी मुलगी जुई नी देखील तिच्या आयुष्यातील पहिली कमाई आत्महत्या ग्रस्त कुटुंबीयांना दान केली.हाच वारस पुढे असाच चालत राहो.शिवाजी चौधरी सारखे काम करणारे लोक फार कमी आहे परंतु यांच्या कडून बघून एक आशेचा किरण आम्हाला दिसतो.असे प्रतिपादन डॉ. अभ्युदय मेघे यांनी केले.
मंचावरून बोलताना सेवाश्रम संचालक शिवाजी चौधरी यांनी आतापर्यंत दहावी, बारावी विद्यार्थांच्या यशाचा पाढा वाचला.यावेळी मंचावर माजी सैनिक श्याम परसोडकर उपस्थित होते.
विद्यार्थांना अल्पोहर देऊन सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहित सहारे, सुशांत वानखेडे,अभिजित वानखेडे,वैभव बारहाते, मंजीरी बारहाते यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये