ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महिला जिल्हाप्रमुख योगिता लांडगे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश  

खा. धानोरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

चांदा ब्लास्ट

जिल्ह्यातील वरोरा ग्रामीण भागात मोठा राजकीय भूकंप झाला असून शिवसेना शिंदे गटाला खिंडार पडले आहे. नेतृत्वावरखासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख योगिता बाळू लांडगे यांच्यासह जिल्हाभरातील असंख्य पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच आणि कार्यकर्त्यांनी सत्ताधारी पक्षाची साथ सोडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

खासदार प्रतिभा धानोरकर यांची जनहिताची ध्येयधोरनावर विश्वास ठेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या सोहळ्यात प्रामुख्याने खापरीचे उपसरपंच अमोल चौधरी, वडगाव आर्वीचे संदीप ढोबळे, उपसरपंच शेरनाताई पेटकर, माजी सरपंच तुळशीराम कारेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सीमा मेश्राम, तंटामुक्त अध्यक्ष कवडू पाल आणि मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे तिरंगी उपरणे खांद्यावर घेऊन पक्षाशी बांधीलकी जाहीर केली.

यावेळी उपस्थित नवनियुक्त सदस्यांचे स्वागत करताना त्यांना काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि विकासाची दिशा समजावून सांगण्यात आली. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या झंझावाती नेतृत्वामुळे आणि योगिता लांडगे यांच्या प्रवेशामुळे वरोरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची ताकद वाढली आहे. सत्ताधारी पक्षाला हा एक मोठा राजकीय धक्का मानला जात असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला जिल्ह्याच्या राजकारणात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या सोहळ्याला खापरी, चिकणी, वडगाव आर्वी आणि परिसरातील अमोल जाधव, शंकर चंदनखेडे, संतोष मेटकर, नाना कोलते, पवन हिरादेवे, सतीश देठे, शिल्पाताई चौधरी, अनुसया राजुरकर, शुभम यमांडरे, रवींद्र बोरेकार, सुनील भोयर, महेश धोटे आणि प्रशांत राऊत यांसह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. पक्ष प्रवेश केलेल्या सर्व सदस्यांनी एकमुखाने खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेचे प्रश्न सोडवण्याचा आणि काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्याचा संकल्प केला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये