ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आज महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे चंद्रपुरात., चार जाहीर सभांना करणार संबोधित

चांदा ब्लास्ट

 चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूलमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते ना. चंद्रशेखर बावनकुळे आज रविवारी चंद्रपूर दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यादरम्यान शहरातील विविध भागांमध्ये चारजाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या सभांमधून ते महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी थेट मतदारांशी संवाद साधणार आहेत.

       आज सकाळी ९.३० वाजता महसूलमंत्री बावनकुळे वेकोलीच्या हेलीपॅडवर आगमन करणार आहेत. त्यानंतर सकाळी १० वाजता तुकुम येथील चवरे ले-आऊट येथे आयोजित जाहीर सभेला ते संबोधित करणार आहेत. सकाळी ११ वाजता श्यामनगर येथे दुसरी जाहीर सभा होणार असून दुपारी १२ वाजता बाबूपेठ येथील नेताजी चौकात तिसरी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. यानंतर दुपारी १ वाजता भिवापूर येथील माता नगर चौकात चौथी जाहीर सभा पार पडणार आहे. या सभांमधून महसूलमंत्री बावनकुळे केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकासाभिमुख व लोककल्याणकारी योजनांची माहिती देत महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन करणार आहेत.

  दरम्यान, दुपारी २ वाजता जोडदेऊळ येथे संत जगनाडे महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून ते अभिवादन करणार आहेत. त्यांच्या या दौर्यामुळे भाजप-शिवसेना-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महायुतीच्या प्रचाराला मोठी गती मिळणार आहे. या सर्व जाहीर सभांना महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये