ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जेसीआय चंद्रपूर गरिमा संस्थेचा १४वा पदग्रहण समारंभ संपन्न

चांदा ब्लास्ट

जेसीआय चंद्रपूर गरिमा संस्थेच्या वतीने सन २०२६–२७ या वर्षासाठी नव्याने निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीचा १४वा पदग्रहण समारंभ दिनांक ०५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता यंग रेस्टॉरंट, चंद्रपूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या पदग्रहण समारंभात सन २०२६–२७ साठी अध्यक्षा म्हणून आर्किटेक्ट पूजा मुंधडा, सचिव म्हणून सोनिका बजाज तसेच ज्युनियर जेसीआय चेअरपर्सन म्हणून दूर्वा लड्ढा यांची निवड करण्यात आली.

तसेच संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा स्वाती पुगालिया व सचिव वृषाली पिंपळकर यांनी आपल्या पदावरून निवृत्ती स्वीकारली आणि सन २०२६–२७ साठी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या कार्यकारिणीची घोषणा व स्थापना करण्यात आली.

या प्रसंगी सन २०२५–२६ या कालावधीत चंद्रपूर शहरात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा सविस्तर वार्षिक अहवाल निवर्तमान अध्यक्षा स्वाती पुगालिया यांनी सादर केला. त्यानंतर नव्या कार्यकारिणीला जेसीआय संस्थेच्या मूलतत्त्वांची शपथ देण्यात आली तसेच नव्या कार्यकारिणी सदस्यांची पदनियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमात आमंत्रित विशेष अतिथींनी उपस्थित सदस्यांना योग्य मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अनुपा भांबरी उपस्थित होत्या, तर विशेष उपस्थिती म्हणून जेसीआय झोन १३ चे अध्यक्ष सौरभ गट्टानी व उपाध्यक्ष स्मृती व्यवहारे उपस्थित होते. तसेच जेसीआय संस्थेचे माजी अध्यक्ष, माजी सचिव, वरिष्ठ पदाधिकारी, सर्व सदस्य व चंद्रपूर शहरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनिर्वाचित अध्यक्षा आर्किटेक्ट पूजा मुंधडा यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जेसीआय चंद्रपूर गरिमा संस्था मागील अनेक वर्षांपासून युवक-युवतींसाठी शैक्षणिक, सामाजिक तसेच वक्तृत्व व व्यक्तिमत्त्व विकासाशी संबंधित प्रशिक्षण शिबिरे व विविध उपक्रमांचे आयोजन करत असून समाजसेवेत सातत्याने योगदान देत आहे. तसेच चंद्रपूर शहरातील युवतींनी संस्थेशी जोडले जावे व संस्थेच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये