ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

14 जानेवारी रोजी मेहुणा राजा येथे संत चोखामेळा यांचा जन्मोत्सव सोहळाचे आयोजन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

जिल्हा परिषद बुलढाणा, पंचायत समिती देऊळगाव राजा, व ग्रामपंचायत, मेहुणा राजा यांच्या संयुक्त विद्यमाने संत चोखामेळा यांचा 758 वा जन्मोत्सव सोहळा चे आयोजन 14 जानेवारी रोजी मेहुणा राजा येथे करण्यात आले आहे. सकाळी 7.30 वाजता महापुजा आमदार मनोज कायंदे व जिल्हा परिषद चे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या हस्ते करण्यात येईल.8 वाजता गावातून पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी 10.30 वाजता स्वागत समारंभात विशेष अतिथी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव उपस्थित राहणार आहेत.

अध्यक्षस्थानी गुलाबराव खरात राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मनोज कायंदे, माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे, माजी आमदार तोताराम कायंदे, डॉ. शशीकांत खेडेकर, हर्षवर्धन सपकाळ,शिक्षणाधिकारी विकास पाटील, बाबुराव नागरे, प्रा. कमलेश खिल्लारे राहणार आहेत. जन्मोत्सव सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गट विकास अधिकारी मुकेश माहोर, सहाय्यक गट विकास अधिकारी डॉ. सुधाकर वायाळ, गट शिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले, सरपंच मंदा बोंद्रे, उप सरपंच साहेबराव काकडे, ग्राम पंचायत अधिकारी विष्णु गीते, सर्व ग्राम पंचायत सदस्य,व गावकऱ्यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये