छत्रपती शिवाजी महाराज ज्युनिअर कॉलेज देऊळगाव राजा येथे 11 वी 12वी उर्दू माध्यम तुकडीसाठी शिक्षकाची नेमणूक करा
जय शिवसंग्राम संघटनेच्या वतीने मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे 11वी 12वी उर्दू माध्यम तुकडीसाठी 25 वर्षापासून शिक्षकांची विद्यार्थ्यांना वाट पहावी लागत आहे. तसेच मराठी माध्यमाची 5वी ते 12वी पर्यंत शाळा हे 100% अनुदानित आहे उर्दू माध्यमाची 5वी ते 10वी पर्यंत ठीक आहे,100% अनुदानित आहे.
परंतु उर्दू माध्यमाची 11वी व 12वि ची तुकडी हे मागील 25 वर्षापासूनविना शिक्षक विनाअनुदानित तुकडी असताना पवित्र पोर्टलवर जाहिरात घेऊन जागा भरल्या जाऊ शकतात, तसेच शासनाचे धोरण असे आहे की भविष्यात विनाअनुदानित तुकड्या टप्प्याटप्प्याने अनुदानावर आणल्या जातील त्यामुळे उर्दू माध्यमाच्या 11वी व 12वी वर्गासाठी बिंदू नामावली उपलब्ध आहे.
परंतु प्रत्यक्षात 5वी ते 12 वी पर्यंत उर्दू माध्यमाची शाळा ही अनुदानित करून किंवा बिंदू नामावली तयार करून प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. याबाबतचे उदाहरण म्हणजे नगरपरिषद हिंगणघाट जिल्हा वर्धा यांनी TAIT 2022 च्या दुसऱ्या टप्प्यात अनुदानित व विनाअनुदानित तत्त्वावरील जागासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध केली होती त्या आधारे संबंधित विद्यालयाला 10 शिक्षक नेमले गेलेले आहेत. उर्दू शाळेत गेल्या 25 वर्षापासून शिक्षक नसल्याने शाळेतील मुला मुलींच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. तातडीने प्रस्ताव तयार करून शाळेतील शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी. या बाबत चे निवेदन कर्तव्यदक्ष आमदार मनोज भाऊ कायंदे यांच्या मार्फत ना. दादाजी भुसे साहेब शालेय शिक्षणमंत्री यांना देण्यात आले.
निवेदनावर तालुकाध्यक्ष जहीर खान. तालुका उपाध्यक्ष मुबारक चाऊस. शहराध्यक्ष अजमत खान. युवक शहराध्यक्ष शंकर वाघमारे. अनिस शाह. संतोष हिवाळे. राजू गव्हाणे. राजेश भाग्यवंत. आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.



