ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
बल्लारपूरातील रोहन गंगाचरण मीणा हा १३ वर्षीय क्रिकेट खेळाडु इंदोर ट्राफी साठी खेळणार!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे
विदर्भ क्रिकेट असोसियन द्वारा यंदा १७ खेळाडूंची निवड झाली असून या अंतर्गत बल्लारपूरची शान रोहन मीणा याचीही निवड झाली असून,बल्लारपूर क्रिकेट एकेडमी चे महेमूद खान सरांनी याची पृष्टी केली आहे.
अंडर १४,१६,१९ चे अनेक खेळाडू आपल्या उत्कृष्ठ खेळामुळं निवळ केल्या जातात.मात्र रोहन मीणा याची निवड एकेडमी साठी विशेष गौरवाची बाब असल्याचे खान सरांनी सांगितले.
१५ ते ३० जानेवारी २०२६ या तारखात इंदोर इथे खेळल्या जाणाऱ्या राज सिंग डंगरपुर् ट्राफी,सेंट्रल झोन साठी विदर्भ क्रिकेट असोसिेएशन तर्फे १७ सदस्यांची निवड झाल्याची माहिती आहे.बल्लारपुर क्रिकेट प्रेमी तर्फे बल्लारपूरची शान रोहन मिणा याला अभिनंदन.



