थोर व्यक्तींच्या यादीतून संत तुकाराम महाराजांचे नाव वगळले
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे नाव समाविष्ट करा : अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
राष्ट्रीय कुणबी महासंघाचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २९ डिसेंबर २०२५ ला सन २०२६ वर्षासाठी राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती व संत महात्म्यांची जयंती व स्मृतिदिन साजरी करण्याबाबतचे अधिकृत परिपत्रक निर्गमित केले आहे.
मात्र त्या यादीत तब्बल ४५ थोर व्यक्तींचा समावेश करण्यात आला.असला तरी महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि वारकरी संप्रदायाचा कळस असलेले जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे नाव वगळण्यात आल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या या कृतीचा कुणबी आणि ओबीसी समाजात संतापाची लाट उसळली असून ही चूक न सुधारल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रीय कुणबी महासंघाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार दलित मित्र व आदिवासी सेवक डी. के. आरिकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडवणीस यांना जिल्हाधिकारी मार्फत दिलेल्या निवेदनातून केला आहे. संत तुकाराम महाराज हे बहुजन समाजाला जागृत करणारे क्रांतिकारक संत होते. त्यांनी आयुष्यभर अनिष्ट प्रथा परंपरेवर प्रहार केले.
मात्र त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचा अपमान करण्यात येत असेल तर संपूर्ण राज्यभर कुणबी महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेळण्याचा असा इशारा देखील राष्ट्रीय कुणबी महासंघाचे अध्यक्ष डी. के. आरीकर यांनी एका निवेदनाद्वारे राज्य सरकारला दिला. आणि म्हणून ताबडतोब संत तुकाराम महाराज यांचे नाव थोर व्यक्तींच्या यादीमध्ये समाविष्ट करावे जर शासनाने आपले धोरण बदलविले नाही तर आगामी काळात राजकीय दृष्ट्या प्रभावी ठरून सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा सुद्धा डी. के. आरीकर यांनी दिला आहे.संत तुकाराम महाराज यांना त्यांच्या निधनानंतरही शासकीय सन्मान मिळण्यासाठी कुणबी ओबीसी समाजाला संघर्ष करावा लागत असेल. तर ही गंभीर बाब असून या सरकारच्या निर्णयाचा कुणबी समाजाच्या वतीने निषेध नोंदवून मोठी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
निवेदन देताना शिष्टमंडळात राष्ट्रीय कुणबी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. के. आरिकर, ॲड. वैशाली टोंगे प्रा.विद्याधर बन्सोड, प्रा.माधव गुरूनुले, इंजि.पी.एस. आरीकर, सुधाकर काकडे, अॅड.मनोज कवाडे, हनुमंत नागापूरे, डॉ. देव कन्नाके, दिनेश एकोणकर, सुधीर कोरडे, संजय फाले आदीसह कुणबी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



