भद्रावती येथे धनोजे कुणबी समाजाचा राज्यस्तरीय उपवर वधु परिचय व सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
धनोजे कुणबी समाज मध्यवर्ती समिती द्वारा पुरस्कृत आस्थादाई समाज मंडळ धनोजे कुणबी तर्फे राज्यस्तरीय उपवर वधु परिचय व सामुदायिक विवाह सोहळा २०२६ चे आयोजन शनिवार दिनांक १० व रविवार दिनांक ११ जानेवारी २०२६ ला स्थानिक राजमनी गार्डन, रेल्वे स्टेशन रोड, गवराळा वार्ड येथे करण्यात आले आहे.
समाजातील विवाहयोग्य उपवर-वधूंना एकाच मंचावर आणून त्यांचा परिचय घडवणे तसेच सामूहिक विवाहाच्या माध्यमातून पालकांचा वेळ श्रम व खर्च कमी करणे, वाचलेला पैसा मुलांच्या शिक्षणासाठी किंवा उद्योग उभारणीसाठी वापरण्यास प्रवृत्त करणे, समाजातील एकता, संस्कृती व प्रगती वाढविणे, समाजामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांना सन्मानित करणे, समाज प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रम तरुण-तरुणी व महिलांसाठी सुप्त गुण प्रदर्शित करण्यासाठी मंच उपलब्ध करून देणे, आदी उद्देशाने या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने स्मरणिकेचे प्रकाशन देखील करण्यात येणार आहे.
या मेळाव्याला खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, आमदार देवराव भोंगळे, आमदार संजय देरकर, डॉ. अशोक जीवतोडे, एड. पुरुषोत्तम सातपुते, श्रीधर मालेकर, महाप्रबंधक अरुण वैद्य, माजी न्यायाधीश अनिल ढवस, एड. अनिल गोवारदिपे, सुप्रसिद्ध उद्योजक सुभाष देवाडकर, एड. दीपक चटप, सुवर्णाताई पिंपळकर आदी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
संपूर्ण समाज बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार या मेळाव्यात उपस्थित राहून या उपक्रमाला यशस्वी करावे, असे आवाहन आस्थादाई समाज मंडळ धनोजे कुणबी तर्फे करण्यात आले आहे.



