घोडपेठ येथे एस.टी. बस थांबत नसल्याने प्रवाशांचे हाल
लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
चंद्रपूर–नागपूर मार्गावरील घोडपेठ बसथांबा येथे सर्व सामान्य व सुपर एस.टी. बसेस थांबविण्याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, चंद्रपूर आगाराकडून अधिकृत आदेश
दिनांक ५ नोव्हेंबर २०२५रोजी निर्गमित करण्यात आले होते. आदेशानुसार घोडपेठ येथे प्रवासी व विद्यार्थ्यांची सुरक्षित चढ-उतार करण्याचे स्पष्ट आदेश असतानाही अनेक बस चालक व वाहक बस न थांबविता पुढे जात असल्याने स्थानिक नागरिक, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या संदर्भात संबंधित विभागाला इंजिनियर जगदीश लवाडियांचे नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
यावेळी गावातील मंजुषा खारकर, वर्षा खारकर, सुनीता भेंडाळे, शंकर खारकर , गीतेश भोयर , विशाल धारावत तसेच स्थानिक ग्रामस्थ व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित अपडेट इंडिया ने दखल घेतली असता पूर्ववत बस थांबा न दिल्यास आंदोलनाची भुमिका स्पष्ट केली.
बातचीत करताना पुढील प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेली.



