ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांना परीक्षा संदर्भात आभासी पध्दतीने मार्गदर्शन

चंद्रपूर मराठी विषय शिक्षक महासंघचा अनोखा उपक्रम

चांदा ब्लास्ट

एच एस सी बोर्ड परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण आलेला आहे. हा विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी मराठी विषय शिक्षक महासंघ, चंद्रपूरच्या द्वारे विद्यार्थ्यांना परीक्षा विषयक मार्गदर्शन कार्यशाळा आभासी पद्धतीने घेण्यात आली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

मराठी विषय शिक्षक महासंघ, चंद्रपूर द्वारे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा संदर्भात मार्गदर्शन कार्यशाळा हा ऑनलाइन उपक्रम घेण्यात आला. परीक्षेच्या संदर्भातील विद्यार्थ्यांवर असलेला ताण कमी करणे व मराठी विषयाच्या कृतीपत्रिकेच्या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे, यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

मराठी विषय कृतीपत्रीके संदर्भात आभासी मार्गदर्शन कार्यशाळेचे अध्यक्ष डॉ विजय हेलवटे, सल्लागार, मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य, उद्घाटक प्रा बाळासाहेब माने, संस्थापक सचिव, मराठी विषय शिक्षक महासंघ , महाराष्ट्र राज्य, प्रमुख अतिथी प्रा संपतराव गर्जे, कार्याध्यक्ष महाराष्ट्र , प्रा डॉ पांडुरंग कंद समन्वयक महाराष्ट्र, प्रा. डॉ ज्ञानेश उपाध्यक्ष मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य तर मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा डॉ माया रंभाळे धरमपेठ महाविद्यालय नागपूर हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. विजय हेलवटे यांनी “हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. चंद्रपूर जिल्हा उपक्रमशील असून याचा आदर्श संपूर्ण राज्याने घ्यावा”, असे मार्गदर्शन केले. उद्घाटन पर मार्गदर्शन करताना प्रा. बाळासाहेब माने, मुंबई यांनी “विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना आत्मविश्वासाने सामोरे जावे. विद्यार्थी हितासाठी चंद्रपूर जिल्ह्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात, हे अभिनंदनीय आहे”,असे मार्गदर्शन केले.

प्रमुख मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. माया रंभाळे यांनी मराठी विषयाची कृतीपत्रिका, त्याचे स्वरूप, गुणविभागणी व परीक्षेत कृतीपत्रिका सोडवताना घ्यावयाची दक्षता, याबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले. प्रश्नपत्रिकेतील एकूण पाच घटक विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. प्रत्येक घटकातील कृतीपत्रिका सोडवताना सुटसुटीत व वेळेचे नियोजन करून सोडवावी असेही मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेच्या संदर्भात विचारलेल्या शंकांचे समाधान डॉ माया रंभाळे मॅडम यांनी केले.

मराठी विषयाच्या कृतीपत्रिकेसंदर्भात घेण्यात आलेल्या आभासी कार्यशाळेचे प्रास्ताविक मराठी विषय शिक्षक महासंघ चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रा. नामदेव मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शुभांगी मोहितकर मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. योगिता धांडे मॅडम यांनी केले.

ही कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता प्रा. गजानन सातपुते कार्याध्यक्ष, देविदास सालवटकर सचिव, मुंडे सर उपाध्यक्ष, किशोर ढोक संघटक, प्राचार्य डॉ सुधीर मोते मार्गदर्शक, महेश गेडाम सर, प्रमोद भोयर, सर, स्वाती गुंडावार, पद्मा पालांदूरकर, रेणुका देशकर तसेच समस्त जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केले. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी भरगोस प्रतिसाद दिला. व अशा प्रकारचे मार्गदर्शन पुन्हा आम्हाला देण्यात यावे अशा प्रकारची मागणी केली. विद्यार्थ्यांचा आग्रह लक्षात घेता अशा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन आपल्यासाठी करण्यात येईल, तसे नियोजन केले जाईल, असे प्रा डॉ ज्ञानेश हटवार, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये