महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन सप्ताहः वर्धा पोलिसांतर्फे सेंट थॉमस स्कूलमध्ये सायबर सुरक्षा व महिला सुरक्षा मार्गदर्शन
शहरात भव्य 'हेल्मेट रॅली'चे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन (रेनिंग डे) सप्ताहाचे औचित्य साधून वर्धा जिल्हा पोलीस विभागातर्फे जिल्ह्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. पाच उपक्रमाचा भाग माणून आज सेंट थॉमस स्कूल, इंजापूर येथे विद्यार्थी आणि शिक्षक वृंदासाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सायबर सुरक्षा आणि महिला सुरक्षेबाबत मार्गदर्शन
या कार्यक्रमात पोलीस विभागातील तज्ज्ञ मार्गदर्शकांनी उपस्थित राहन सध्याच्या काळात वाढत चाललेल्या सापचर गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती दिल्ली, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
तसेच, महिला व बाल सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन करताना महिलांच्या हक्कांवाचत आणि आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांशी संपर्क कसा साधावा, याबद्दल माहिती देण्यात आली, सोवतय, सार्वजनिक वाहतुकीचे नियम पाळणे किती महत्त्वाचे आहे, हे विद्याध्यर्थ्यांना विविध उदाहरणांतून पटवून देण्यात आले. सादर कार्यक्रमाला वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक श्री विलास पाटील पोलिस अंमलदार रियाज खान, वर्धा सायबर सेल चे सहायक पोलिस निरीक्षक श्री आशीष चीलांगे महिला पोलिस अंमलदार मिना कौरोती, अंकित जिथे, भरोसा सेल च्या सहायक पोलिस निरीक्षक श्रीमती माधुरी वाघाडे यांनी मार्गदर्शन केले
दि. ४ जानेवारी रोजी भव्य ‘हेल्मेट रॅली’
रस्ते सुरक्षा आणि हेल्मेटच्या वापराबाबत जनजागृती करण्यासाठी उद्या रविवार, दिनांक ०४/०१/२०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता वर्धा वाहतूक विभागातर्फे भव्य हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
रॅलीचा मार्ग खालीलप्रमाणे राहीलः प्रारंभः पोलीस मुख्यालय, वर्धा (सकाळी १०:०० वाजता)
मार्ग: पोलीस मुख्यालयतुन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते बजाज चौक मार्गे आर्वी नाका ते धुनिवाले मठ मार्गे आरती चौक. समारोपः आरती चौकातून रॅली पुन्हा पोलीस मुख्यालय वेथे येऊन विसर्जित होईल. वर्धा पोलीस विभागातर्फे या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना हेल्मेट वापरण्याचे आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



