ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष प्रतिनिधींची तिसरी बैठक

आदर्श आचारसंहिता व निवडणूक प्रचाराबाबत आयुक्तांनी दिली माहिती

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर 02 जानेवारी 2026 रोजी चंद्रपूर महानगरपालिकेत सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची व उमेदवारांची तिसरी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत निवडणूक प्रक्रिया, आदर्श आचारसंहिता तसेच निवडणूक प्रचाराबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आयुक्त तथा निवडणूक अधिकारी अकुनुरी नरेश यांच्याद्वारे करण्यात आले.

  यावेळी आयुक्तांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करताना, निवडणूक प्रचार करताना कायदेशीर मर्यादा, प्रचाराच्या वेळा, ध्वनिक्षेपकांचा वापर, भित्तीचित्रे, फलक, बॅनर, पोस्टर्स यासंदर्भातील नियम स्पष्ट केले. तसेच, शासकीय मालमत्तेचा गैरवापर टाळणे, सामाजिक माध्यमांवरील प्रचार करताना नियमांचे पालन करणे, धार्मिक, जातीय किंवा आक्षेपार्ह भाषेचा वापर टाळणे याबाबत विशेष सूचना देण्यात आल्या. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

  बैठकीदरम्यान राजकीय पक्ष प्रतिनिधींनी व उमेदवारांनी विविध सूचना व प्रश्न उपस्थित केले असून त्यांचे निरसन प्रशासनामार्फत करण्यात आले. आगामी निवडणूक पारदर्शक, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व पक्षांनी, उमेदवारांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. सदर बैठकीस विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये