समर्थ कृषी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा : डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला अंतर्गत समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा येथे राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सावित्रीबाई फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य वंचित घटकांच्या विकासासाठी, स्त्री शिक्षणाच्या प्रसारासाठी तसेच अस्पृश्यांना समाजात समान अधिकार मिळवून देण्यासाठी समर्पित केल्याचे सांगितले. तत्कालीन जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.उपप्राचार्य देवानंद नागरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा अंगीकार करावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमातून शिक्षणाच्या माध्यमातून समाज बदलता येतो, हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये बळकट झाला.
सावित्रीबाई फुले यांचे विचार प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळाली.या कार्यक्रमाचे रा.से.यो. अधिकारी प्रा. योगेश चगदळे,जिमखाना अधिकारी प्रा. अरुण शेळके, संजू लाड, गबाजी लाड व रा.से.यो. स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



