ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा साहित्य संमेलनात रंगले निमंत्रितांचे कविसंमेलन

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई अनुदानित वनवैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी येथे गडचिरोली जिल्हा साहित्य संमेलनात निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले.कवी संमेलनाध्यक्ष मालती सेमले यांच्या उपस्थितीत काव्यमय मैफील रंगली.निमंत्रितांच्या या कविसंमेलनात उपस्थित सर्वच कवींनी उत्तमोत्तम कविता सादर करुन सभागृहातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी इरफान शेख,मिलिंद उमरे,संगीता ठलाल,प्रविण किलनाके,एकनाथ बुद्धे,संतोष उईके,महेश कोलावार,विश्वंभर गहाणे,गायत्री गेडाम, सपना कन्नाके,रोशनी दाते,अपर्णा नैताम,गजानन गेडाम,भारती तितरे, यामिना मडावी,प्रल्हाद मेश्राम,प्रतिक्षा कोडापे,मनिषा हिडको,विनायक धानोरकर,चेतन ठाकरे, आयल चिकटे,रुपेश कुत्तरमारे, क्रांतिवीर सिडाम,पूर्वा कुंभारे,प्रेम जरपोतवार,राखी ताजणे,इशा पटकोटवार,प्रमोद बोरसरे आदी कवींनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

कविसंमेलनाचे आयोजन राज मुसणे,संयोजन महेश कोलावार ,संचालन नरेश बोरीकर यांनी केले तर आभार गणेश सिंगाडे यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये