सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्री बाई फुले यांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, सहकार महर्षी स्व भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा, जनसेवा सामाजिक संघटना व ज्येष्ठ नागरिक संघटना यांच्या वतीने विरंगुळा भवन येथे क्रांतिज्योती सावित्री बाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री बळीराम मापारी होते, श्री मधुकर शेळके, प्रा विजय रायमल, कैलास शेळके यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला, सहकार महर्षी स्वर्गीय भास्कर रावजी शिंगणे सार्वजनिक वाचनालय चे अध्यक्ष श्री काशिनाथ खांडेभराड यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनात घडलेल्या प्रसंगाचे वर्णन केले, सौ आशाताई शेळके यांनी क्रांतिज्योती सावित्री बाई फुले यांच्या कर्तृत्वाचे गौरव गीत सादर केले.
या कार्यक्रमाला देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष श्री मधुकरराव धुळे, श्री रामदास कुलथे, श्री मार्तंड आप्पा घिके, श्री पंडितराव पाथरकर, श्री गोरे साहेब, श्री शांतीलाल निरपळे, अरुण सपाटे, प्रा विजय रायमल, श्री जनार्दन मांटे उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन श्री प्रकाश अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव श्री गोविंदराव बोरकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



