सैन्य व आर्मी भरती सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वखर्चातून दिले क्रिडांगण तयार करून
ध्येय वेडा तरुण योगेश मिसाळ धावला विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा : तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात नव – तरुण विद्यार्थी सैन्य व आर्मी भरतीची तयारी करत आहे. परंतु बऱ्याच गावामध्ये सैन्य व आर्मी भरतीची तयारी करण्यासाठी क्रिडांगण उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांची हिरामोड होतांना दिसून येत आहे. ग्रामीण भागात कुठलीही सोयी- सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सिंनगांव जहाँ येथील ध्येय वेडा तरुण योगेश मिसाळ हा धावून आल्याने सैन्य व आर्मीची भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील सिंनगांव जहाँगिर येथील विद्यार्थ्यांना मिळेल त्याठिकाणी सराव करावा लागत होता. सरावासाठी व्यवस्थित क्रीडागणं उपलब्ध नसल्याने सराव करावा कसा..? असा प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला होता.
अशातच सिंनगाव जहागीर येथील मल्हार सेनेचे युवानेते योगेश मिसाळ यांनी विद्यार्थ्यांना होणारा त्रास पाहताच खर्चाचा कुठलाही विचार न करता स्वखर्चातुन सैन्य व आर्मीची भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना पडीत मोकळ्या जागेवर जेसीबीच्या साहाय्याने साफ सफाई करून त्या ठिकाणी 120 व्हॅटच्या लाईटाचा प्रकाश झग-मगाट करून रात्री उशिरा पर्यंत सराव करता यावा यासाठी मोठे क्रिडांगण तयार करून दिले. त्याचबरोबर काटेरी झाडांनी वेढलेल्या रस्त्याची दुरुस्ती देखील करण्यात आली. नव्यानेचं उपलब्ध करून दिलेल्या क्रिडांगणावर दररोज शेकडो सैन्य व आर्मीची भरती करणारे विद्यार्थी मोठ्याप्रमाणात सराव करतांना दिसून येत आहे.
सैन्य व आर्मी भरतीचे सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आभार मानतांना दिसत आहे. गेल्या अनेकवर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारा योगेश मिसाळ हा गावातील अनेक वयो वृद्धाच्या अडी -अडचणी सोडविण्यासाठी तत्पर राहतोय.ध्येय वेड्या योगेश मिसाळ यांच्या कार्याची सर्वस्तरावरून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.



