पोंभूर्णा तालुक्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसने रणशिंग फुंकले
आढावा बैठक उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभूर्णा तालुक्यात होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात पार पडली. सदर बैठक मा. संतोषसिंह रावत, माजी अध्यक्ष, सीडीसीसी बँक, चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत निवडणूक तयारीचा सखोल आढावा घेण्यात आला. बूथनिहाय संघटन अधिक मजबूत करणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे, पक्षांतर्गत गटबाजी टाळणे, इच्छुक उमेदवारांशी सविस्तर चर्चा करणे तसेच मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी ठोस रणनीती आखण्यात आली. जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर आधारित प्रचार करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे मा. मंगेशजी उपरे (तालुका अध्यक्ष, दलित आघाडी) तसेच उमरी पोद्दार ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बैठकीच्या शेवटी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये पोंभूर्णा तालुक्यातील दोन्ही जिल्हा परिषद व चारही पंचायत समितीच्या जागांवर काँग्रेसचा एकतर्फी विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला.
या बैठकीला वासुदेव पाल (तालुका काँग्रेस अध्यक्ष) यांच्यासह अशोक गेडाम, विलास मोगरकर, ओमेश्वर पद्मगिरीवार, प्रशांत उराडे, वैशाली बुरांडे, कवडूजी कुंदावार, विनोद थेरे, अमित पाल, जगदीश शेमले, वैभव पिंपळशेंडे, राजाराम मोहुर्ले, पराग मुलकुलवार, प्रशांत झाडे, अरुण तलांडे, नंदाताई मोरे, पपिताताई कावरे, उपमताई नैताम, दिलीप म्याडावार, म्याडावार ताई, नीलकंठ नैताम, मडावी सर, भालचंद्र बोधलकर, धम्मा निमगडे, बालू कावरे, गणेश अर्जुनकर, विनायक बुरांडे, तेजराज भुरसे, मनीष राऊत, शुभम वासाडे, उदय बोबडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



