ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत वॉकथॉन रॅलीचे आयोजन

सदर रॅलीची सुरवात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समीर शेख यांच्या हस्ते

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय वर्धा व वाहतूक शाखा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने वॉकेथा‌ॅन रॅली चे आयोजन करण्यात आले.यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था वर्धा, न्यू आर्टस् कॉलेज वर्धा व नवोदय विद्यालय वर्धा यांचा प्रतिसाद मिळाला.

सदर रॅलीची सुरवात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समीर शेख यांनी हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली.यामध्ये रस्त्यावरील चालणाऱ्या नागरिकांना Walk on Right बद्दल समुपदेशन व जनजागृती करण्यात आली.

यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील व वाहतूक शाखेतील स्टाफ उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये