ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाकेबंदी दरम्यान कारसह देशी विदेशी दारूचा 6 लाख 75 हजारांवर मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

          दिनांक 04/10/2024 रोजी स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा येथील पथक पोलीस स्टेशन सेवाग्राम परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मुखबीर कडून खबर मिळाली की एक मारुती कंपनीची स्विफ्ट एम.एच.02 सि.एच.9783 नंबरच्या कारणे सावंगी असोला जिल्हा नागपूर येथील लोओ पोर्ट बार मधून देशी विदेशी दारू चा माल घेऊन वर्ध्याकडे येत आहे. अशा माहिती वरून त्याच्यावर नाकेबंदी करून प्रो. रेड केला असता आरोपी नामे आकाश राजेश तांबेकर वय 34 वर्ष रा. गौरक्षण वार्ड, वर्धा यांच्या ताब्यातून 1) तिन खरड्यांच्या खोक्यात देशी दारूने भरलेल्या 90 एम एल च्या 300 सिलबंद शिशा. 2) चार खरड्यांच्या खोक्यात विदेशी दारूच्या ऑफिसर चॉईस कंपनीच्या 180 एम एल च्या 192 सीलबंद शीशा. 3) दोन खरड्यांच्या खोक्यात ऑफिसर चॉईस ब्लू कंपनीच्या विदेशी दारू ने भरलेल्या 72 सीलबंद शीशा 4) दोन खड्यांच्या खोक्यात रॉयल स्टॉग कंपनीच्या 180 एम एल च्या 96 सीलबंद शीशा 5) एका खड्याच्या खोक्यात आयकॉनिक व्हाईट कंपनीच्या 180 एम एल च्या 36 सीलबंद शीशा 6) दोन खड्यांच्या खोक्यात काल्स बर्ग कंपनीच्या 500 एम एल चे 48 सीलबंद बियरचे कॅन 7) एक ग्रे रंगाची मारुती कंपनीची स्विफ्ट एम.एच 02 सि.एच.9783 क्रमांकाची कार असा एकूण 6,75,800/- रुपये* चा मुद्देमाल जप्त केला

           सदरचा माल पसार आरोपी बादल धवणे रा. आदिवासी कॉलनी, वर्धा यांच्या सांगण्यावरून लिओ पोर्ट बारचा मालक रा. सावंगी असोला जिल्हा नागपूर येथून आणल्याचे सांगितल्याने तिन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

          सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पो.उपनि अमोल लगड, सलाम कुरेशी, पोलीस अंमलदार हमीद शेख, सचिन इंगोले, श्रीकांत खडसे,राजेश तिवसकर, प्रमोद पिसे, रामकिसन ईप्पर, आशिष महेशगौरी, विकास मुंढे,अरविंद इंगोले,उदय सोळुंकी सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये