Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शरदराव पवार महाविद्यालयाचे प्रा.डॉ. शरद बेलोरकर यांना राष्ट्रीय सेवा योजना सर्वोत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

गोंडवाना विद्यापीठाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात सन्मानित.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 गडचांदूर-सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली ,सलग्नित गडचांदूर येथील शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. शरद बेलोरकर यांना राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य शासनाचा 2022-23 या सत्राचा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी तसेच महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट एकक राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार जाहीर झाला आहे रोख रक्कम,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल गोंडवाना विद्यापीठाद्वारे आयोजित 13व्यां वर्धापन दिन समारंभात प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह,कार्यक्रमाधिकारी डॉ. शरद बेलोरकर यांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांचे हस्ते गौरव करण्यात आला.

याप्रसंगी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे,प्र कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे , माजी कुलगुरू डॉ. विजय आईचवार , व्यवस्थापन परिषदेचे सदस्य गुरुदास कामडी आणि व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय गोरे तथा विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. श्याम खंदारे, व इतर व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य व मान्यवर उपस्थित होते. राज्यस्तरीय पुरस्कारामुळे गोंडवाना विद्यापीठाला बहुमान प्राप्त झाला असून विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. श्याम खंदारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

         प्रा. डॉ. शरद बेलोरकर हे महाविद्यालयात गेल्या 17 वर्षापासून रासेयो कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत आहे. याआधी त्यांना चंद्रपूर जिल्हास्तरीय उत्कृष्ट रासेयो कार्यक्रम अधिकारी, मागील वर्षी विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी म्हणून गोंडवाना विद्यापीठाने पुरस्कार देऊन त्यांच्या गौरव केला होता. त्यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या रासे यो सल्लागार समिती सदस्य म्हणून कार्य केले आहे तसेच चंद्रपूर जिल्हा रा सेयो विभागीय समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.तसेच त्यांनी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे आव्हान शिबिरात गोंडवाना विद्यापीठाचे यशस्वी नेतृत्व केले आहे.डॉ. शरद बेलोरकर यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून दत्तक गावात विविध प्रकल्प व समाज उपयोगी कार्य केले असून शिबिराच्या माध्यमातून आरोग्य विषयक जनजागृतीअभियान, शासकीय उपक्रमांची माहिती,रक्तदान शिबिर, अंधश्रद्धा निर्मूलन शिबिर, साक्षरता अभियान,जलसंधारण उपक्रम त्याचप्रमाणे स्वच्छता अभियान यासारखे समाज उपयोगी कार्य शिबिराच्या माध्यमातून केले आहे याकरिता महाविद्यालयाचे,दत्तक गावातील सरपं,उपसरपंच पदाधिकारी,आजी/माजी रासेयो स्वयंसेवक यांचे सहकार्य लाभले आहे.

 डॉ.शरद बेलोरकर यांच्या भरीव कामगिरीबद्दल सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंद अडबाले व सर्व संस्था पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह, विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.संजय गोरे,डॉ. हेमचंद दूधगवळी, डॉ. सुनील बीडवाईक, डॉ. राजेश गायधनी, डॉ.माया मसराम, डॉ.सत्यन्द्र सिंह प्रा. मंगेश करंबे तथा मुख्य लिपिक श्री.शशांक नामेवार आणि विनोद उरकुडे, रमेश भोयर तानाजी बुरान,धर्मराज पोहणे सुरेश चांदेकर व सुभाष टेकाम इत्यादी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी. व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये