ताज्या घडामोडी

बोर व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने वन्यजीव सप्ताहाचे आयोजन

2 ते 8 ऑक्टोंबर कालावधीत वन्यजीव सप्ताह

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा :_ बोर व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने दि.2 ते 8 ऑक्टोंबर या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करुन राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ 2 ऑक्टोंबर रोजी जंगल सफारीचे उद्घाटन करुन होणार आहे. वन्यजीव सप्ताहात नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दि.2 ऑक्टोंबर रोजी जंगल सफारीच्या उद्घाटनानंतर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. नवीन बोर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे उदघाटन, बोर व्याघ्र प्रकल्पाच्या चित्रफितीचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.3 ऑक्टोंबर रोजी शाळांमध्ये वन्यजीव विषयावर इयत्ता 1 ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यासाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व प्रश्नोत्तरे स्पर्धा, कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण व वनसृष्टी बदल जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

दि.4 ऑक्टोंबर रोजी सकाळी 7.30 ते 9.30 वाजता पर्यंत शालेय विद्यार्थी व पक्षीप्रेमींकरीता पक्षी निरिक्षण, दि. 5 ऑक्टोंबर सकाही 7 ते 9 वाजेपर्यंत वर्धा ते बोरधरण बाईक रॅली व वनपरिक्षेत्रधिकारी हिंगणी ते बोरधरण सायकल रॅली. अधिकारी व कर्मचारी गाईड, जिप्ती चालक तसेच स्थानिक रहिवाशी यांचेकरीता आरोग्य तपासणी शिबिर व पीआरटी व आरआर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.6 ऑक्टोंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रिडा स्पर्धा, कर्मचारी, गाईड, जिप्सी चालकांकरीता फोटोग्राफी स्पर्धा, दि.7 ऑक्टोंबर रोजी गवत कुरण विकास कार्यशाळा व महिला सशक्तीकरण कार्यशाळा. दि.8 ऑक्टोंबर रोजी बक्षिस वितरण, स्वयंसिध्द बचतगटाद्वारे उत्पादित वस्तुंचे प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, असे बोर व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालकांनी कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये