सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, जनसेवा सामाजिक संघटना, देऊळगाव राजा सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा, व जेष्ठ नागरिक संघटना देऊळगाव राजा यांच्या वतीने विरंगुळा भवन येथे आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादुर शास्त्री यांची जयंती तसेच तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चा वर्धापन दिन साजरा करण्यात आला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे अध्यक्ष बळीराम मापारी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य अविनाश राजे जाधव, मानद संचालक गोविंदराव अहिरे, जेष्ठ नागरिक संघटना चे अध्यक्ष प्रा विनायक कुळकर्णी, सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय चे अध्यक्ष प्रकाश खांडेभराड होते, सर्वप्रथम महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,
यावेळी रमेश नरोडे, प्रा अशोक डोईफोडे, बबनराव नागरे, प्रा विजय रायमल, प्रा विनायक कुळकर्णी, सतीश कुळकर्णी, अविनाश जाधव, प्रकाश खांडेभराड, गोविंदराव अहिरे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, व या दोन्ही राष्ट्रपुरुषांचे अनुकरण करण्यात यावे असे सांगितले,
यावेळी प्रकाश अहिरे, गोविंदराव बोरकर, बाबुलाल शिवरकर, पंडितराव पाथरकर, मधुकरराव धुळे, मार्तंडराव घिके, रामदास कुलथे, अरुण सपाटे, गणेश देशपांडे, घनश्याम भंडारे, अरुण खरात तथा इतर उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन प्रकाश अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव गोविंदराव बोरकर यांनी केले, पसायदान ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली,



