ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सद्गुरू वै. रामचरणदास महाराज पुण्यतिथी उत्सव संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

ह.भ.प. गुरुवर्य डॉ. भगवानबाबा आनंदगडकर यांच्या आशिर्वादाने व ह.भ.प. गंभीर गुरुजी यांच्या प्रेरणेने ह.भ.प.प.पू.सद्गुरु वै.रामचरणदास महाराज यांचा २३ व्या पुण्यतिथीनिमित्त आदर्श कॉलनी येथील संत सेनाजी महाराज सामाजिक सभागृह येथील प्रांगणामध्ये एकदिवसीय पुण्यतिथी सोहळा दि. २९ डिसेंबर रोजी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

ह.भ.प.संतचरणदास निकम गुरुजी यांचे प्रवचण व नंतर गुरुवर्य ह.भ.प. डॉ. भगवानबाबा आनंदगडकर यांचे काल्याचे किर्तन झाले.

आमदार मनोज कायदे यांनी व उत्सव समितीच्या वतीने डॉ भगवानबाबा आनंदगडकर यांचा सत्कार करण्यात आला . याप्रसंगी आयोजन समितीच्या वतीने उपस्थित आ मनोज कायंदे -नवनिर्वाचित नगराध्यक्ष माधुरी शिंपणे व नवनिर्वाचित नगरसेवक व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .या उत्सवात वारकरी टाळकरी भजनी मंडळ व भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.याप्रसंगी असंख्य भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. उत्सवाचे आयोजक

ह.भ.प.देविदास खरात गुरुवर्य रामचरणदास बाबा पुण्यतिथी उत्सव समिती, आदर्श कॉलनी, देऊळगांवराजा यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये