ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अतिक्रमणाविरोधात वाहतुक पोलीस व मनपाची संयुक्त कारवाई

२० दुचाकी वाहने जप्त ; गाळेधारकांना नोटीस

चांदा ब्लास्ट

शहरात रस्त्यावर अतिक्रमण करून वाहने विक्री करणाऱ्यांवर वाहतूक पोलीस व चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे संयुक्त कारवाई करण्यात आली असुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर जुनी वाहने विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांची २० दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.

       जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महत्त्वाच्या मार्गावर अतिक्रमण, जुनी चार चाकी दुचाकी वाहने विक्री करण्याची दुकाने अवैधरित्या थाटण्यात येतात. दुकानासमोर पार्किंग करणाऱ्या नागरिकांची वाहने थोड्या वेळापुरती वाहने दुकानासमोर उभी राहतात मात्र विक्री करणाऱ्यांची वाहने पुर्ण वेळ रस्त्यावर उभी राहतात यामुळे या अतिक्रमणांचा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो तसेच फुटपाथवरही अतिक्रमण होत असल्याचे लक्षात घेऊन २० दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.

       त्याचप्रमाणे काही दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर पत्र्याचे शेड लाऊन फुटपाथवर अतिक्रमण केले असल्याचे आढळुन आल्याने त्यांचे अतिक्रमण जेसीबी द्वारे काढण्यात आले असुन काही गाळेधारकांना गाळे सील करण्याबाबत अंतिम सूचना देण्यात आल्या आहेत. रोडवरील जे जुनी चार चाकी व दुचाकी विक्री करणारे स्थायी दुकानदार आहेत त्यांनी आपल्या दुकानासमोर कोणतेही वाहन विक्रीकरिता लावु देऊ नये,वाहन विक्री करावयाची असल्यास विक्रीकरिता स्वतः जागा उपलब्ध करून घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

        सदर कारवाई उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात  सहायक आयुक्त सचिन माकोडे,सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार,वाहतुक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,अतिक्रमण निर्मुलन अधिकारी राहुल पंचबुद्धे तसेच मनीष शुक्ला,अनिल खोटे, भरत बिरिया, बंडू चहरे विक्रम महातव,डोमा विजयकर,अमरदीप साखरकर यांनी केली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये