ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती वर्धा शहर सन-२०२४ च्या अध्यक्षपदी दिनेश थुल,महासचिव पराग धवन तर कोषाध्यक्ष राजेश खडसे यांची अविरोधपणे निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान वर्धा येथे दि.२५ फेब्रुवारी २०२४ (रविवार) रोजी सन-२०२३ च्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पंकज लभाने तसेच पदाधिकारी व भीम सैनिकांनी वर्धा शहर सन-२०२४ ची विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती ही परंपरेनुसार लोकशाही पद्धतीने गठित करण्याकरीता बैठकीचे आयोजन केले होते.

रवि जगताप यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.यावेळी सन २०२३ च्या समितीने जमा खर्चाची मांडणी केली व वर्धा शहर सन- २०२४ च्या १३३ व्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी दिनेश थुल,महासचिव पराग धवन तर कोषाध्यक्ष पदी राजेश खडसे यांची अविरोधपणे निवड केली आहे.

     सदरहू बैठकीला महेंद्र मुनेश्वर,विशाल रामटेके,अतुल दिवे,वसंत भगत,अजय मेहरा,सोनु कांबळे,भिमा शंभरकर,धर्मपाल शंभरकर,चिंतामण बुरबुरे,बंडू फुलमाळी,संदीप भगत,पवन धवणे,आशिष मेश्राम,समाधान पाटील,संजय वर्मा,दिलीप सुखदेवे,सुरज बडगे,शारदाताई झामरे,उमाताई इंगोले,रत्नमाला साखरे,सरिता भगत,विशाल नगराळे,प्रशांत भिसे,कृणाल सहारे,प्रविण धम्मशिल सेलकर,आशिष जांभुळकर सौरभ हातोले, बादल शेळके, नितीन धारगावे आदिंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती वर्धा शहर,सन-२०२४ कार्यकारिणी घोषित करण्याचा ठराव एकमताने घेण्यात आला.संपुर्ण समिती गठीत करण्याचे सर्व अधिकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती वर्धा शहर सन – २०२४ चे अध्यक्ष दिनेश थुल,महासचिव पराग धवन व कोषाध्यक्ष राजेश खडसे या आंबेडकरी कार्यकर्त्यांकडे सोपविन्यात आले.सर्वांचे आभार महेंद्र मुनेश्वर यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये