ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चामुंडा ज्वेलर्स सराफा दुकान फोडी मध्ये जिल्हा पुणे येथील आंतरराज्य नानावत गैंग मधील आरोपीतांना अटक

गुन्हयातील चोरीस गेलेले सोन्या-चाँदीचे दागीन्यांसह एकुण २९ लाख ४१ हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन पुलगाव जिल्हा वर्धा येथे फिर्यादी नामे श्री. गणेश महेंद्र गाखरे, वय ४२ वर्ष, रा. वार्ड क. ११ पुलगाव ता. देवळी जि. वर्धा यांनी तक्रार दिली की, दि. २०/०७/२०२५ ने पहाटे ०३/३० वा. चे दरम्याण त्यांचे चामुंडा ज्वेलर्स, सराफा दुकान मध्ये कोणीतरी अज्ञात चोरटयांनी दुकानाचे शटर वाकवुन दुकानात प्रवेश करून दुकानातील सोन्या, चांदीचे दागिने असे एकुण १२,७६,५००/-रू. गा मुद्देमाल काबुन चोरून नेला अश्या तकार वरून पो. स्टे. पुलगाव येथे अप. क्र. ५७३/२०२५ कलम ३०५ (अ), ३३१ (४) वि.एन.एस. २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन यांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांचे वेगवेगळे चार (०४) पथके तयार केले. स्थानीक गुन्हे शाखेचे पथक गुन्हयाचा सलग समांतर तपास करीत असतांना गुन्हयातील घटनास्थळा वरील प्राप्त सि.सि.टी.व्ही. फुटेज मध्ये आरोपी हे स्वतःची ओळख लपवीने करीता तोंडाला कापडाने बांधुन असल्याचे व त्यांचे हातात गुल्हेर बाळगुण स्पोर्ट बाईक व्दारे प्रवास करीत असल्याचे दिसुन आले, त्यावरुन अशा प्रकारे सराफा दुकान फोडी करणाऱ्या राज्यातील सक्रिय गुन्हेगारांची माहीती घेतली असता अशा प्रकारे गुन्हे करणारी गैंग ही जिल्हा पुणे येथील नानावत गैंग नावाने सक्रिय असल्याची माहीती मिळाली त्यावरुन स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा येथे पथक रांजनगाव जिल्हा पुणे येथे जावुन नानावत गैंगचे लोकांचे हालचालीवर सतत १० दिवस गुप्त पाळत ठेवुन बारकाईने शोध घेत असता सदरचा गुन्हा हा नानावत गैंग, जिल्हा पुणे यांनी केलेला असल्याची खात्रीशिर तांत्रीक माहीती प्राप्त केले व सदर गैंग मधिल आरोपी नामे १) विक्की उर्फ यामी नंदु राठोड वय २८ वर्षे, रा. फंडवस्ती बाभुळसरा (खुर्द) रांजनगाव जि. पुणे याने त्याचे साथीदारासह सदर गुन्हा केलेला असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीतांचा शोध घेत असतांना आरोपी हा पोलीस स्टेशन चिखली, पिंपरी चिंचवड जिल्हा पुणे हद्‌दीत असल्याची माहीती प्राप्त झाल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेवुन त्यास गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार नामे २) वामन नंदु राठोड, ३) राहुल उर्फ काळया नंदु राठोड, दोन्ही रा. फंडवस्ती बाभुळसय, रांजनगाव ता. शिरूळ जि. पुणे व इतर साचीदारासह केला असल्याचे सांगितले. आरोपी कमांक २) वामन नंदु राठोड, वय ३५ वर्षे, रा. फंडवस्ती बाभुळसरा (खुर्द) रांजनगाव जि. पुणे यास सुध्दा ताब्यात घेवुन त्यांना गुन्हयातील चोरी केलेल्या सोन्या चांदीचे दागीन्याबाबत सखोल विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हयातील सोन्याचांदीचे दागीने हे त्यांचे गैंग मधील सक्रिय महीला आरोपी क्रमांक ३) श्रीमती आशा राजुभाई ठक्कर, वय ४२ वर्षे, रा. कैलास रियेयस फ्लॅट नं. ८०२ (बी), अहमदाबाद जि. अहमदाबाद राज्य गुजरात, व ४) सोमपाल नारायणसिंग, वय ३१ वर्षे, रा. हरवत ता. आसपुर जि. डुंगरपुर राज्य राजस्थान यांना विकी केल्याचे सांगीतल्याने अहमदाबाद राज्य गुजरात येथे स्थानीक गुन्हे शाखेचे पथक जावुन त्यांचा सतत ९ दिवस शोध घेवुन करजान जिल्हा बडोदरा राज्य गुजरात येथे सापळा रचुन सदर महीला आरोपी व तिचा साथीदार यांना ताब्यात घेवुन गुन्हयातील सोन्याचांदीचे दागीने बाबत विचारपुस केली असता त्यांनी सदर चोरीतील सोन्याचांदीचे दागीने खरेदी केल्याचे सांगीतल्याने त्यांचे ताब्यातुन गुन्हयातील १) दोन चाँदीचे धातुची वीट बजन ८ किलोग्रॅम किंमत ५,६०,०००/-रु. २) एक सोन्याची लगह वजन ४५ ग्रॉम किंमत ४,३६,५००/-रु, असा एकूण जु. किंमत ९,९६,५००/- रु चा मुद्देमाल जप्त केला तसेच त्यांचे ताब्यातुन गुन्हयात वापरलेली ३) एक हयुन्दाई बेरना चारचाकी कार क. एम.एच. १२ एलजे. ४०७४ कि. ७,००,०००/-रु. ४) एक मारोती कम्पनीची अर्टीका चारचाकी कार क्रमांक जी.जे. ०१ एम.टी. १७४७ किंमत १२,००,०००/-रु. १५) आरोपी वापरत असलेले ०३ वेगवेगळया कंपनीचे अॅन्ड्रॉईड मोवाईल कि. ४५,०००/-रू, असा एकुण जु. किंमत २९,४१,५००/- या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गैंग मधील आरोपीतांवर संपुर्ण महाराष्ट्र राज्यात तसेच ईतरही राज्यात मोठ्या प्रमाणात सराफा दुकाना व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनी, बालाजी लालपालवाले, पोउपनी विजयसिंग गोमलाडु, पोउपनी राहुल इंटेकर, पोलीस अंमलदार हमीद शेख, चंद्रकांत बुरंगे, शेखर डोंगरे, भुषन निघोट, अमर लाखे, धर्मेंद्र अकाली, अमर पाटील, अमोल नगराळे, मंगेश चावरे, विकास मुंडे, सुगम चौधरी, सर्व नेमणुक स्था. या वर्षात अनमकावले अति जिभे सर्व नेमणक सायबर सेल यांनी केली

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये