ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रभाग क्रमांक-१ हनुमान नगरातील शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये भव्य प्रवेश

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : शहर काँग्रेस कार्यालयात आज मोठ्या उत्साहात प्रभाग क्रमांक १ हनुमान नगरातील शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला खासदार प्रतिभा धानोरकर, राज्याचे माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस शहर कमिटीचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे वरिष्ठ कार्यकर्ता एजाज रिझवी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रसंगी नवीन कार्यकर्त्यांचे हार्दिक स्वागत करून नेत्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हनुमान नगर परिसरातील युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी काँग्रेसच्या जनआंदोलन व लोकाभिमुख धोरणांवर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केला. यात प्रकाश केशवराव खुटेमटे, अरुण सेवकजी तुर्डे, सलीम खान तड़वी, सैय्यद अहमद, कमलेश देवगडे, सुरेश रागीत, बबन गणपतराव जेमकावडे, अरुण सोनकर, चंपतराव नंदे, विजय मसाडे, वसंत पांडुरंग गुंडो, मनहव डुक्से, प्रकाश टोंगे, बाबा जिवतोड़े, रउफ इब्राहिम शेख, मोहन राजेश्वर गंधारे, विजय वानखेड़े, सुनील धवस, मोतीराम वडाई यांचा समावेश आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये