होली फॅमिली स्कूलचे 16 विध्यार्थी राज्यस्तरिय मिनिगोल्फ स्पर्धेसाठी रवाना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या विभागस्तरीय मिनिगोल्फ क्रीडा स्पर्धेमध्ये होली फॅमिली स्कूलच्या 29 पैकी 16 विद्यार्थ्यांची निवड राज्य स्तरावर झालेली आहे.
यामध्ये 17 वर्षाखालील मुले आणि मुलीचा गटा मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे तसेच 14 वर्षाखालील मिश्र गटामध्ये रिद्धीमा आणि प्रित यांही प्रथम व अमिश याने एकेरी गटा मध्ये द्वितीय क्रमांक पटकविला होता या सर्व खेळाडूंचे नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मिनिगोल्फ स्पर्धे मध्ये निवड होऊन ते आज नागपूर साठी रवाना होत आहेत शाळेचा प्राचार्य यांही राज्य स्तरावरून राष्ट्रीय स्तराला निवड होईल अशी आशा दर्शवली आहे शाळेचा प्राचार्य सिस्टर दीपा व उप प्राचार्य सिस्टर जिस्मि लोकल मॅनेजर सिस्टर नवीन, क्रीडा शिक्षिका जुही शेख,क्रीडा शिक्षक प्रीतम चौधरी सर या सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या



