ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी विकास कामात योगदान द्यावे _ आमदार मनोज कायंदे 

पेन्शन भवन साठी 1 करोड रुपये देण्याचे आश्वासन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विकास कामात फार मोठे योगदान असून त्यांनी परिसरातील समस्या मांडाव्यात त्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून देऊळगाव राजा येथे प्रशस्त पेन्शन भवन साठी 1 करोड रुपये निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदार मनोज कायंदे यांनी देऊळगाव राजा येथे तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना च्या वतीने आयोजित पेन्शन डे कार्यक्रमात बोलताना दिले,

विरंगुळा भवन येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे मानद संचालक गोविंदराव अहिरे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मनोज कायंदे,बुलढाणा जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे अध्यक्ष डॉ मधुकरराव परहाड होते. इतर मान्यवर मध्ये चंद्रशेखर सदावर्ते, तेजराव साबळे, प्रा रामदास शिंगणे, कुऱ्हाले , विनायक खराटे , रावसाहेब पुजारी, बळीराम मापारी, काशिनाथ खांडेभराड,धनशिराम शिपणे , स्टेट बँक ऑफ इंडिया चे व्यवस्थापक अंकुश रोडे, डॉ अशोक काबरा , होते.

याप्रसंगी डॉ मधुकर पऱ्हाड , धानशिराम शिपणे, रावसाहेब पुजारी, गोविंदराव अहिरे, प्रकाश खांडेभराड, विजय रायमल , श्रीधर जगताप, प्रा विनायक कुळकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला मधुकर धुळे, रमेश गवई, पंडितराव पाथरकर, कैलास शेळके, आशाताई शेळके, राम चौधरी, अरुण सपाटे,प्रा प्रदीप मिनासे, प्रा अशोक डोईफोडे, सर्जेराव वाघ, गजानन ढवळे, रंगनाथ सपाटे, सुशील हनुमंते ,गोपाळराव बोरुळ, संजय वासलेकर, अ ना लताड, पूर्णचंद्र जोशी, राजेंद्र गोरे, दत्ता कोरडे, मधुकर शेळके, नंदकिशोर बाहेती, रामदास कुलथे, मार्तंड आप्पा घिके, दशरथ नरोडे , मांटे सर, मेहमूद बेग, मुन्ना ठाकूर तथा इतर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रमेश नरोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव गोविंदराव बोरकर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये