माणिकगढ सिमेंट वर्क्सच्या वतीने आरोग्य शिबिर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
माणिकगढ सिमेंट वर्क्स गडचांदूर आपल्या अधिनस्त काम करत असणाऱ्या कामगारांच्या आरोग्याची काळजी नेहमीच घेत असते.
त्याकरिता सर्व कामगार व त्यांच्या परिवारानां आरोग्य सुविधा व्यावसायिक आरोग्य सुविधे द्वारा पुरविण्यात येतात तसेच वर्षातून एकदा सर्व कामगारांचे वैद्धकीय तपासणी सुद्धा करण्यात येत असते.
माणिकगढ सिमेंट च्या मानव संसाधन विभागाद्वारे कामगारांच्या सुदृढ आरोग्यकारिता मानव संसाधन विभागाचे प्रमुख अमित पाथक यांच्या मार्गदर्शनाखाली कामगाराकरिता कार्य करित असतानि आरोग्य विषयक कुठलीही इजा होऊ नये यांकारिता डॉ स्नेहल डोके यांचे द्वारे प्रात्यक्षिका द्वारे मार्गदर्शन करण्यात आलेत.
डॉ स्नेहल डोके या स्वतः एक उत्तम फिजिओथेरपिस्ट असून त्यांच्या कार्यामुळे भरपूर गरजूना शारीरिक व मानसिक सुदृढ आरोग्य प्राप्त झाले आहेत.
या कार्यक्रमात कामगारांना संगणकावर काम करण्याची योग्य कार्य पद्धती, मोबाईल हाताळण्याची योग्य क्रिया, जड वस्तू उचलण्याची योग्य पद्धत, तसेच डोळे, डोके, मान, पाठ, कंबर, पाय व हात यांना कुठलीही काम करतांना इजा होणार नाही या करिता व्यायाम व थेरपी सांगण्यात आलीत.
आजच्या युगात मानवाचे मानसिक व शारीरिक आरोग्य दिवसेंदिवस कमकुवत होत चाललेत यांकारिता डॉ स्नेहल डोके यांचे द्वारे उपाययोजना करून दाखविल्या गेल्यात.
माणिकगढ सिमेंट च्या व्यावसायिक आरोग्य सेवा मधील डॉ सना खान व मानव संसाधन विभागाचे नंदिनी सिंग यांनी या कार्याला यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न केलेत.



