ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती येथे विद्यार्थ्यांकरीता एकदिवसीय श्रीगुरुदेव सुसंस्कार कार्यशाळेचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर समिती, भद्रावतीच्या वतीने दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोज रविवारला श्री मुरलीधर पाटील गुंडावार लाॅन, भद्रावती येथे एक दिवसीय सुसंस्कार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असुन वर्ग ६ ते वर्ग १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत सहभागी होता येईल.

सकाळी ६.३० वाजता पासुन या कार्यशाळेला सुरुवात होऊन उपासना संस्कार, योग संस्कार, ध्यान संस्कार, आरोग्य संस्कार, जीवन संस्कार, कथा संस्कार, भजन संस्कार, खेळ संस्कार, सुसंवाद संस्कार आदी विषयांतर्गत विविध तज्ञ मंडळीद्वारे विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात येईल.

सध्याची विस्कळीत दिनचर्या, दुषीत खानपान व त्यामुळे होणारे आजार, मोबाईलचा सैर वापर, भडक -अश्लिल हीनदृश्याचे प्रसारण, व्यक्तिमत्व शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना देण्यात येणारे असह्य शिक्षण व त्यातून जडणारे मानसिक रोग, ताणतणाव आदीचा सुळसुळाट झाला आहे.

अशा परिस्थितीत सुसंस्कारयुक्त सदगुणांनी सहज शिक्षणातुन बाल तरुणांची मने घडुन त्यांच्या व्यक्तिमत्वाचा योग्य विकास व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत प्रवेश घेण्याकरीता दिनांक २० डिसेंबर २०२५ रोज शनिवारला दुपारी ४.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत श्री मुरलीपाटील गुंडावार लाॅन, सब्जी मार्केट, भद्रावती येथे विद्यार्थ्यांच्या शालेय ओळखपत्राची झेराॅक्ससह प्रत्यक्षात येऊन नोंदणी करावी लागेल. बाहेरगावातील विद्यार्थ्यांना सुध्दा या कार्यशाळेत सहभागी होता येत असुन त्यांना प्रत्यक्षात मोबाईल वरुन त्यांची नोंदणी करता येईल.

आयोजित एक दिवसीय सुसंस्कार कार्यशाळेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन अधिक माहितीसाठी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर समिती, भद्रावतीच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये