गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रो रेड – विदेशी दारु व बिअरसह एक मोपेड वाहन जप्त

एकूण 1 लाख 52 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

      सविस्तर असे कि, दिनांक 18/10/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा कडून पो स्टे सेवाग्राम हद्दीत हॉटेल मेजवानी येथे प्रो. रेड केला असता वरनमूद वर्णनाचा दारूसाठा मिळून आला, सदर दारू साठा फरार आरोपी धीरज खंगार याने मोपेड वाहनाने आणल्याचे रतनसुत ढोले यांनी सांगितल्याने मोपेड वाहन ताब्यातील मोपेड गाडी जप्त करून विदेशी दारू व मोपेड,1) रॉयल स्टॅग कंपनीच्या 750ml चे 9 बंपर की.14,400/- रू2) ऑफिसर चॉईस ब्ल्यू कंपनीच्या 180ml च्या 37 शिश्या की.11,100/- रू3) रॉयल स्टॅग कंपनीच्या 180ml च्या 23 शिश्या की.8,050/- रू4) ओ. सि.ब्ल्यू कंपनीच्या 12 शिष्या कि 4,200 रू  5) बड वाईजर कंपनीच्या 24 बिअर कॅन 8400 रू 6) हावर्ड्स कंपनीच्या 500 ml 8 बिअर कॅन की,2800 रू 7) ट्यूबर्ग कंपनीच्या 500 ml च्या 38 बिअर कॅन 13,300 रू. 8) एक कापडी पिशवी की, 50 रु 9) एक MH 32 AN 1130 मेस्ट्रो कंपनीची मोपेड गाडी की,90,000 रू. असा एकूण जु.कि.1,52,250/- चा मुद्देमाल असा एकुण जु.कि. 1,52,250/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर 1) रतनसुत धर्मपाल ढोले , वय 24 वर्ष, रा. आंबेडकर नगर नालवडी ता.,जि. वर्धा.2) धीरज खंगार, रा. हिंदनगर, वर्धा (पसार) आरोपी विरुध्द पो. स्टे. सेवाग्राम येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

       सदर कारवाई पथक पोलिस अधीक्षक, अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.विनोद चौधरी, पो. उपनि. सलाम कुरेशी, पो. हवा. नरेंद्र पाराशर, ना.पो.अं. नितीन इटकरे,सागर भोसले, पो. अंम. संघसेन कांबळे, मिथुन जिचकार सर्व स्था.गु.शा. वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये