ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले यांचे विचार व कार्य आजही प्रेरणादायी – डॉ. हेमचंद दुधगवळी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

        आज 21व्या शतकात आपण जीवन जगत असलो तरी आपले वर्तन मात्र पुरातन काळातच जीवन जगणाऱ्या माणसांसारखे आहे असेच दिसून येते म्हणून आजच्या पिढीने सावित्रीबाई फुले यांचे विचार आत्मसात करून आपले वर्तन सुधारावे, “ज्ञान नाही विद्या नाही,ती घेण्याची गोडी नाही,तयास मानव म्हणावे का?” आपल्याला माणूस म्हणून लोकांनी ओळखावे असे वाटत असेल तर आपण अधिकाधिक ज्ञान संपादन करावे आणि महापुरुषांनी दिलेल्या प्रगतीच्या वाटेवर चालावे.

असे प्रतिपादन डॉ. हेमचंद दूधगवळी यांनी केले ते शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर येथील मराठी भाषा विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रमात बोलत होते.

     प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून डॉ .संजय गोरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला त्याचबरोबर महाविद्यालयातील विद्यार्थी कु. शाहीदा अली, शुभम कंठाळे , कु .रंजीता तेलजीरे कु. दुर्गा चटारे ,कु .दीक्षा वाघमारे कु.आचल वरारकर यांनीही अभ्यासपूर्ण आपले विचार व्यक्त केले आज आम्ही सावित्रीबाई फुले यांच्या जीवन आणि कार्यामुळेच तुमच्यासमोर ताठपणे उभे आहोत असाच सूर सर्व विद्यार्थ्यांचा होता.

     या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून डॉ. सुनील बिडवाईक, डॉ. राजेश गायधनी,डॉ. शरद बेलोरकर ,डॉ. माया मसराम, ग्रंथपाल मंगेश करंबे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागाच्या प्रा. उज्वला जानवे यांनी केले तर ग्रंथपाल मंगेश करंबे यांनी आभार मानले, कार्यक्रमात मुख्य लिपिक शशांक नामेवार, विनोद उरकुडे,रमेश भोयर तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यात शिक्षकेतर कर्मचारी तानाजी बुरान, सुभाष टेकाम,धर्मराज पोहाणे,सुरेश चांदेकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये