ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दमदार पावसामुळे भात पीक शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभीड तालुक्यात भात पीक महत्वाचे असून गेल्या १५दिवसापासून पावसाने द डी मारल्याने बडी राजा शेतकरी हवालदिल झाला होता. पावसाची चातकासारखी वाट पाहत असताना काल सायंकाळी वरून राजाने पावसाची कृपा केली. यामुळे शेतकऱ्यात आनंद गगणात मावेनासा झाला.

भात पीक काही ठिकाणी वाळायला लागले होते तर काही ठिकाणी जमिनीला भेगा पडल्या असता शेतकरी चिंतेत असल्याचे दिसून येत होते. पाऊस झाल्याने भात पीक शेतकरी बळीराजा पावसाने आनंदी असल्याचे चित्र तालुकाभर दिसून येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये