ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री बालाजी महाराज यात्रा उत्सव समितीची नियोजन सभा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

विदर्भाचा तिरुपती बालाजी म्हणून लाखो भाविकांच्या हृदयात जागृत देवस्थान म्हणून स्थान असलेल्या देऊळगाव राजा येथील श्री बालाजी महाराजांच्या यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यात्रा उत्सव समितीची सभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती.

तीनशे तीस वर्षांपासून अखंडितपणे देऊळगाव राजा शहरात अश्विन व कार्तिक महिन्यात श्री बालाजी महाराज यात्रा महोत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो. घटस्थापना, मंडपोत्सव, लळीत उत्सव आणि नंतर आठवडी बाजाराच्या जागेत भरणारी यात्रा हे सर्व उपक्रम नियोजनबद्ध पद्धतीने साजरे व्हावे यासाठी मा. उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा आयोजित करण्यात आली. या सभेसाठी व्यासपीठावर श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, तहसीलदार श्याम धनमने, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मालवीय, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

यात्रा समितीच्या प्रमुख उपसमित्या, यामध्ये सार्वजनिक स्वच्छता समिती, आरोग्य समिती, पाणीपुरवठा समिती, विद्युत पुरवठा समिती, शांतता व सुव्यवस्था समिती, जागा वाटप समिती यांच्या कामकाजाबद्दल २८ मुद्द्यांवर सभेमध्ये चर्चा करण्यात आली. सर्व्हे नंबर ९८ मधील वाढत्या अतिक्रमणाला पायबंद घालावा व यात्रेसाठी परिसर मोकळा करावा, असे ठरवण्यात आले. इतरही विषयावर चर्चा करण्यात आली. या सभेसाठी यात्रा समिती सदस्य, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, पत्रकार बंधू भगिनी, सर्व समाजाचे सेवेकरी, मानकरी, प्रशासनाचे सर्व विभाग व श्री बालाजी संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये